पोट सुटत असेल तर प्या दालचिनी चहा


पोट सुटत असेल तर प्या दालचिनी चहा

दालचिनी वजन कमी करण्यात मदत करते. यासाठी आपल्याला केवळ दालचिनीचा चहा तयार करून सेवन करायचे आहे. दालचिनी सेवन केल्याने मेटाबॉलिझमची काम करण्याची क्षमता वाढते ज्याने वजन कमी करायला मदत मिळते. दालचिनीच्या चहाने हार्मोन्समध्ये अचानक इन्सुलिन वाढण्याचा धोका कमी होतो. या चहात कॅलरीज नसते ज्याने लठ्ठपणावर नियंत्रण मिळतं.
अनेक लोकं दालचिनीचा चहा बनवतात परंतू चुकीच्या पद्धतीने. येथे जाणून घ्या चहा बनवण्याची योग्य पद्धत-

सामुग्री- 1 लीटर पाणी, 1 लहान दालचिनीची काडी किंवा 5 लहान चमचे दालचिनी पावडर, 1/2 चमचा मध
कृती- एका भांड्यात पाणी उकळून घ्या. दालचिनी पावडर टाकून मिश्रण मध्यम आचेवर पाच मिनिटासाठी राहू द्या. हा चहा गार होऊ द्या नंतर यात मध मिसळा. हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिसळून घ्या.

दिवसातून तीनदा सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी या चहाचे एक-एक कप सेवन करा. आपण आपल्या आवडीप्रमाणे हा चहा गार किंवा गरम सेवन करू शकता.cp
Share:

Low Carb Indian foods

Low Carb Indian foods to consume

 Low Carb Indian foods to consume
1.Curds
2.Raita
3.Almonds
4.Peanuts
5.Strawberries
6.Black raspberry
7.Blueberry
8.Watermelon
9.Peaches
10.Avocado
11.Mushrooms
12.Cauliflower
13.Lettuce
14.Sprouts
15.Pumpkin
16.Coconut Water
17.Coconut oil
18.Coconut Butter
19.Bhindi
20.Broccoli
21.Carrots
22.Beetroot
23.Sprouted Moong
24.Apple
25.French Beans
26.Paneer
27.Bottle gourd
28.Cabbage
29.Bitter gourd
30.Zucchini
31.Capsicum
32.Cucumber
33.Brinjal

Indian Foods high in Carbs
 Indian Foods high in Carbs
1.Potatoes
2.Sweet Potatoes
3.Yam
4.Purple Yam
5.Rice
6.Sugar
7.Honey
8.Mango
9.Custard apple
10.Banana
11.Chickoo
Share:

अदरक ज्यूस पिण्याचे फायदे/Ginger water drinking benifits

*" आपले उत्तम आरोग्य हेच आमचे धन "*
========================
*7 दिवस अदरकचे पाणी रिकाम्या पोटी प्या, त्यानंतर जे होईल ते तुम्हीच पहा*
========================
           अद्रकचे पाणी पिण्यामुळे होणाऱ्या फायद्या बद्दल बोलणार आहोत. भारतामधील प्रत्येक स्वयंपाकघरा मध्ये अद्रक असते. अदरक आपण चहाचा स्वाद वाढवण्यासाठी करतो. याच सोबत अदरकचा वापर आपण भाजीची चव वाढवण्यासाठी देखील करतो. पण आपल्याला हे माहीत नाही की जर रोज सकाळी रिकाम्या पोटाने एक कप पाण्यात अदरकचा एक छोटा टुकडा टाकून 5 मिनिट उकळवून नंतर थंड झाल्यावर पिण्यामुळे हे एखाद्या औषधी सारखे काम करते. 7 दिवस जर अदरकचे पाणी रिकाम्या पोटी पिण्यामुळे जे होईल ते तुम्हीच पहा.
           अदरकचा वापर आपण चहा आणि भाजी मध्ये करतो. तुमचे वय कितीही असो अदरक रस तुमच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. वाढत्या वया सोबत शरीर कमजोर आणि आजारी पडत जाते त्यामुळे जर तुम्ही याची सुरुवाती पासूनच काळजी घेतली तर नंतर त्याचा फायदा होतो.
           सकाळी अदरक रस पिण्यामुळे अनेक प्रकारचे आजार बरे होतात. याच सोबत डायबिटीज आणि सांधेद्खी मध्ये पण आराम मिळतो. अदरक रस पिण्यामुळे कोलेस्ट्रोल कमी होते. जर तुम्ही रोज अदरक रस प्यायले तर तुम्हाला गळ्याचा त्रास, सर्दी, ताप, डोकेदुखी आणि कैंसर सारखे 10 गंभीर आजार होणार नाहीत. अदरक ज्यूसचे अन्य फायदे माहीत करण्या अगोदर आम्ही तुम्हाला सांगत आहोत अदरक ज्यूस बनवण्याची पद्धत.

*साहित्य :*

एक लहान अदरक तुकडा
एक लिंबू
मध (कार्बानिक मध आवश्यकतेनुसार)
*अदरक ज्यूस बनवण्याची पद्धत*
           सकाळी सर्वात पहिले अदरक स्वच्छ धुवून घ्यावे आणि त्यास कापावे. त्यानंतर या कापलेल्या अदरकच्या तुकड्यांना मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे. आता याचा ज्यूस एका ग्लास मध्ये काढून घ्यावा आणि त्यामध्ये वरून मध मिक्स करावे आणि लिंबू पिळावा. अश्या प्रकारे तुमचा रोगनाशक आयुर्वेदिक अदरक ज्यूस तयार होतो.

*सकाळी अदरक ज्यूस पिण्याचे फायदे – Ginger water benefits in Marathi*
*कैंसर मध्ये फायदेशीर*:
          अदरक ज्यूस पिण्यामुळे कैंसर पासून माणसाचे संरक्षण होते. अदरक मध्ये कैंसरला विरोध करणारे गुण मिळतात. अदरक कैंसरच्या सेल्स वाढू देत नाही
*सांधेदुखी :*
            ज्यालोकाना सांधेदुखीने हैरान केले आहे त्यांनी अदरक रस जरूर प्यावा त्यामुळे त्यांना नक्की आराम मिळेल.
*डायबिटीज (मधुमेह)* :
           जर तुमच्या परिवारात किंवा ओळखी मध्ये कोणाचे ब्लड शुगर वाढले असेल तर एक ग्लास अदरक ज्यूस रोज प्यावे. एक महिना नियमीत पिण्यामुळे वाढलेली शुगर लेवल सामान्य होते.

*ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते* :
            सकाळी रिकाम्या पोटी अदरक पाणी पिण्यामुळे शरीराचे ब्लड सर्क्युलेशन ठीक राहते. अदरक एक ब्लड प्युरीफायर आहे. हे शरीरात ब्लड सर्क्युलेशन मजबूत करते. हे रक्ताला पातळ करणारे आहे आणि लिम्फ तंत्र आणि रक्त वाहिन्यांची घाण साफ करते.
*Constipation ची समस्या दूर करते* :
           जर रोज सकाळी रिकाम्या पोटी अदरकचे पाणी प्यायले तर Constipation ची समस्या दूर होते. कारण अदरक चे पाणी शरीरात डाइजेस्टीव ज्यूस वाढवते. यामुळे अन्न लवकर डाइजेस्ट होते. 7 दिवस रोज रिकाम्या पोटी अदरक ज्यूस पिण्यामुळे तुम्हाला फरक जाणवेल.

*ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो* :
         अदरक पाणी ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते कारण यामध्ये सोडियम आणि पोटैशियमचे प्रमाण अतिशय कमी असते. ज्यामुळे ब्ल्डप्रेशर लेवल नियंत्रित राहते.
*सर्दी-खोकला आणि वायरल इन्फेक्शन पासून वाचवते* :
            अदरक चे पाणी पिण्यामुळे बॉडीची इम्युनिटी वाढते. यामुळे वारंवार होणारी सर्दी-खोकला आणि वायरल इन्फेक्शन यांचा धोका कमी होतो. खोकल्यासाठी तर अदरक रामबाण उपाय आहे.

   

Share:

Benefites of Green Tea

#ग्रीन_टी_चे_फायदे | Benefits Of Green Tea

तुम्ही ग्रीन टी / Green Tea पिता का ?

जर तुम्ही तुमचे स्वास्थ सुधारायचे ठरविले असेल तर याचे सेवन नक्कीच करा.

ग्रीन टी चे फायदे – Benefits Of Green Tea In Marathi
Green Tea

आपण सर्व जाणतो कि ग्रीन टी चे किती फायदे आहेत.?यामध्ये भरपूर प्रमाणात प्रतिरोधक असतात जे कर्करोगाच्या समस्या दूर करू शकते. ग्रीन टी मधील प्रतिरोधके आपल्या पेशीमध्ये मृत होणाच्या समस्येला दूर करतो त्यामुळे पेशी मृत पावण्याचे प्रमाण कमी होते. हृदयावरील हल्ल्याची समस्या पण दूर करण्यास मदत करते. शरीरातील कोलेस्ट्रोल चे प्रमाण कमी करते. रोग प्रतिकारक शक्ती वाढवितो. ग्रीन टी रोज पिण्यामुळे आपले वजनपण कमी होते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत मिळते. आपले शरीर तंदुरुस्त राहते. यामध्ये जीवनसत्व क मुळे सर्दीमध्येहि फार लाभ मिळतो.

चला तर मग जाणू या कि घर बसल्या ग्रीन टी ला कसे बनविता येईल.

Ingredients of Green Tea
ग्रीन टी साठी लागणारी सामग्री :-
१) ग्रीन टी ची पत्ती – १ चम्मच ( रेडीमेड प्याक मधील )
२) पाणी – १ कप
३) स्वादानुसार शहद
४) स्वादानुसार निंबू रस

Green Tea Recipe
ग्रीन टी बनविण्याचा विधी:-
१ कप पाणी गरम करावे. पाणी गरम करतेवेळी जास्त गरम करू नये. उकडन्याआधीच बंद करावे.
आता यात १ चम्मच ग्रीन टी ची पत्ती टाका. २-3 मिनिटे मिळवत राहावे. नंतर चहाच्या कपाट गाळून घ्या. निंबू रस व शहद स्वादानुसार टाकून चांगले ढवळा व गरमागरम ग्रीन टी चा आनंद घ्या

सूचना :-

१) ग्रीन टी बनविताना त्यामध्ये दुध टाकू नका सोबतच साखरेचा वापर करू नका. हे स्वास्थासाठी हानिकारक ठरू शकते.
२) ग्रीन टी मध्ये पुदिन्याची पाने टाकल्यास याचा स्वाद बदलून जाईल.
३) ग्रीन टी चे पाणी पूर्णपणे उकडलेले नसावे.
४) बाजारात ग्रीन टी ब्याग चा वापर हि करू शकता.
ग्रीन टीच का ?
हजारो वर्षापासून भारतीय आयुर्वेदात ग्रीन टीचा वापर केला जातोय. सध्याचा चहा इंग्रजांनी भारतात आणला. त्याआधी भारतीय लोक वनौषधी पान पाण्यात टाकून प्यायचे.

एशिया खंडात सर्वात जास्त उच्च रक्तदाबाचे रोगी आहेत. कर्करोगाचे रोगीही येथे बऱ्याच प्रमाणात जास्त आहेत.

चीन देशात ग्रीन टी चा शोध लागला. आता संपूर्ण जागत याचा वापर वाढत आहे.

याच्या वापरामुळे कर्करोग व उच्चरक्तदाबाची समस्या दूर होण्यास मदत मिळते. तसेच वजन कमी करणे व झोप चांगली लागणे असे अनेक फायदे यापासून होतात. याच्यातील प्रतिरोधक तत्व आपल्या आरोग्यासाठी फारच लाभदायी ठरतात.
खालील काही ग्रीन टी च्या सेवनाने होणारया फायद्याबद्दल जाणू या.

ग्रीन टी चे फायदे

१.वजन कमी करणे

ग्रीन टी शरीरातील पाचन तंत्रास वाढवतो.
अतिरिक्त चरबीस शरीरातून बाहेर टाकतो. पोलीफिनोन तत्वामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर टाकता येते. त्यामुळे रक्तप्रवाह विकसित होते. व वजन कमी करण्यास मदत होते.

२.मधुमेह

ग्रीन टी च्या सेवनामुळे रक्तामधील साखर कमी करता येते. त्यामुळे मधुमेहांच्या रुग्णासाठी हि एक वरदान सिद्ध होते. हे इन्सुलिन ला नियंत्रित करतो त्यामुळे मधुमेहात त्रास कमी होतो.

3.हृदयासंबंधी आजार

वैज्ञानिकच्या मते ग्रीन टी हि रक्तवाहिनी नलीकांवर मजबुतीचे आवरण चढवते त्यामुळे रक्तातील अतिरिक्त चरबी व साखर शरीराबाहेर टाकल्या जाते. तसेच रक्ताचा प्रवाह हृदयात चांगला ठेवतो.

४.भोजन नलीकेचा कर्करोग

ग्रीन टी मुळे भोजन नलीकेच्या कर्करोगाची समस्या दूर होते. यासोबतच आणखी काही हानिकारक कर्करोगांमध्ये डॉक्टर ग्रीन टी चे सेवन करण्याचे सुचवतात याचे नियमित सेवन केल्यास कर्करोग निर्माण करणाऱ्या कोशिकांना नष्ट करता येते.

५ कोलेस्ट्रोल

ग्रीन टी रक्तातील घाण म्हणजेच कोलेस्ट्रोल ची मात्र कमी करण्यास फायदेशीर ठरते.

६.दातांमधील सडने

अभ्यासातून या गोष्टीचा सुगावा लागला आहे. कि ग्रीन टी पिल्याने दातातील हानिकारक ब्याक्टेरीया आणि वायरस कमी होतात त्यामुळे दात सडत नाहीत व दात स्वस्थ ठेवले जातात.

७.रक्तदाब

रोज सकाळी ग्रीन टी चे सेवन रक्तदाब नियंत्रित ठेवतो.

८.मानसिक दडपण

ग्रीन टी च्या सेवनाने आपले मानसिक आरोग्य चांगले होते. मस्तिष्कातील चेतापेशींना अधिक प्रभावी बनविल्यामुळे मानसिक दडपण येत नाही व मनस्थिती उत्तम राहते.

९.एन्टी वायरल आणि एन्टी ब्याक्टेरीयल

ग्रीन टी मध्ये एन्टी वायरल आणि एन्टी ब्याक्टेरीयल तत्व असतात. त्यामुळे इन्फ़्लुएन्जा च्या कर्करोगापासून बचाव होते. अभ्यासातून हे समजले आहे कि ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम पेय आहे.

१०.त्वचेची रक्षा

ग्रीन टी मुळे त्वचेच्या संबंधी विविध समस्यांवर चांगले उपचार करता येतात. ग्रीन टी च्या सेवनाने त्वचा निरोगी व ताजी तवानी बनते. तसेच उन्हाळ्यात त्वचेच्या सूर्यकिरणामुळे होनाऱ्या त्रासाला कमी करते.

तर मग कशाची वात बघताय तुम्ही? जा आणि आपल्यासाठी ग्रीन टी चा एक कप बनवा आणि याच्या आरोग्यदायी फायद्यांचा लाभ घ्या.

Share:

बीट खाने के फायदे /बीट खाण्याचे फायदे / Benefits Of Beetroot

बीट खा आणि हेल्थी रहा !!

बीटामुळे तुमच्या ब्लड प्रेशर पासुन तर सेक्सुअल स्ट्रमिना वाढवण्याची क्षमता असते. हे एक नॅचरल फूड कलरचे कामसुध्दा करते. आज आम्ही तुम्हाला बीटचे अशे फायदे सांगणार आहोत की, जे ऐकुण तुम्ही चकीत होऊन जाल. चला तर मग पाहुया या गुणकारी बीट चे कोणते चमत्कारी फायदे आहेत...
1. ब्लड शुगर लेवल कमी करते
बीट नायट्रेट्सचा एक चांगला स्रोत आहे. याचे सेवन केल्यावर हे नायट्राट्स आणि एक गॅस नायट्रिक ऑक्साइड्समध्ये बदलते. हे दोन्ही गुण धमन्यांना रुंद करण्यात आणि ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते. संशोधनानुसार प्रत्येक दिवशी 500 ग्रॅम बीट खाल्ल्याने 6 तासांच्या आत ब्लड प्रेशर कमी होते.

२.बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, फ्लोवेनॉइड्स आणि बेटासायनिन असते. बेटासायनिनमुळेच बीटाचा रंग लाल-जांभळा असतो. हे एक शक्तीवर्धक अँटीऑक्सीडेंट आहे. हे एलडीएल कॉलेस्ट्रॉलचे ऑक्सीकरण कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे ते धमन्यांमध्ये जमा होत नाही. यामुळे हृदविकाराचा धोका कमी होतो.
३ गर्भवती महीलांना फायदेशीर
बीटमध्ये उच्च प्रमाणात फॉलिक अॅसिड असते. हे गर्भवती महीला आणि त्याच्या होणा-या बाळासाठी महत्त्वाचे आहे. गर्भवती महीलांना यामुळे अतिरिक्त उर्जा मिळते.

४ .दिवसातुन दोन वेळा बीटचे ज्युस प्यायल्याने आस्टिओपरोसिस आणि हाडे व दातांच्या दुस-या समस्या होणार नाही.

५ . डायबिटीज वर नियंत्रण
ज्या लोकांना डायबिटीज आहे ते बीट खाऊन त्यांची गोड खाण्याची इच्छा पुर्ण करु शकता. हे खाण्याचा फायदा होतो कारण यामुळे गोड खाण्याच इच्छा पुर्ण होते आणि ब्लड शुगर लेवलसुध्दा वाढत नाही, कारण यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स वेजिटेबल असते. यामध्ये कॅलरी जास्त असतात आणि हे फॅट फ्री असते. डायबिटिजच्या रुग्णासाठी हे चांगले औषध आहे.
६.बीट मध्ये मोठ्या प्रमाणात आयरन असते आणि आयरनमुळे हीमाग्लूटनिनि बनते, जे रक्ताचा असा भाग असतो की, जे ऑक्सीजन आणि अनेक पोषक तत्त्वांना शरीराच्या दुस-या अंगापर्यंत पोहचवण्यास मदत करतो. बीट मधील हेच आयरन तत्त्व एनीमिया पासुन लाढण्यास मदत करता.
७. सेक्शुअल हेल्थ आणि स्टॅमिना वाढवते
बीटला नैसर्गिक वियाग्रा म्हटले जाते. जुन्या काळात याचा उपयोग यौन स्वास्थ वाढवण्यासाठी केला जात होता. बीट नायट्रिक ऑक्साइड रिलीज करते ज्यामुळे रक्त वाहीन्यांचा विस्तार होतो आणि जेनेटल्समध्ये रक्ताचा प्रवाह वाढतो. या व्यतिरिक्त बीटमध्ये मोठ्या प्रमाणात बोरॉन केमिकल असते, जे ह्यूमन सेक्स हार्मोनच्या निर्मितीसाठी मदत करते. यामुळे पुढच्या वेळेस वियाग्रा घेण्याचा विचार करत असाल तर पहीले बीट ट्राय करा.
८ . कँसरसाठी फायदेशीर
बीटाचे बेटासायनिन तत्त्व अजुन एक चांगले आणि महत्त्वाचे काम करते. एका संशाधनात सिध्द झाले की, ज्या लोकांना ब्रेस्ट किंवा प्रोस्टेट कँसर होतो, त्यांनी बीट खाल्ले तर त्यांचा ट्यूमर वाढण्याची गती 12.5 टक्के कमी होते.
Share:

डोळ्याखालील वर्तुळे घालवण्यासाठी

डोळ्याखालची वर्तुळे घालविण्यासाठी…

सतत डोळे चोळणं, अॅलर्जी, झोप न येणं, डोळ्यांखालची निस्तेज त्वचा, वयोमान, डीहायड्रेशन, आनुवंशिकता आणि कधी कधी पिगमेण्टेशनमुळेही डोळ्यांखाली काळी वर्तृळं निर्माण होतात. एलर्जीमुळे डार्क सर्कल्स येत असतील, तर एलर्जीचं कारण पूर्णपणे नष्ट करायला हवं.
तणाव, कमी झोप यांमुळे डोळ्याच्याखाली काळी वर्तुळे तयार होतात. ते घालवण्यासाठी डॉक्टर आणि त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या क्रिमचा वापर केला जातो. पण, जर काही घरगुती उपाय केले तर ही वर्तुळे काही प्रमाणात कमी करता येऊ शकतात. त्यासाठी काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणेः
१. चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवा. सकाळी धुऊन टाका. यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.
२. टोमॅटो आणि लिंबाचा रस डोळ्यांच्या खाली लावून तो सुखल्यावर चेहरा धुवून घ्यावा. नियमित असे केल्याने डोळ्याखालची वर्तुळे हळू-हळू कमी होतात.
३. बदामाच्या तेलाने जवळपास २० मिनिटे डोळ्यांभोवती मसाज करावा.
४. पुदीन्याचा रस लावल्यानेही काळी वर्तुळे कमी होतात.
५. काकडीच्या किंवा बटाटयाच्या चकत्या डोळ्यांवर ठेवल्यामुळे डोळ्याखालील फुगीरपणा कमी होऊन तिथली त्वचा ताजीतवानी होते.
६. साध्या थंड टी बॅग्ज डोळ्यांभोवती ठेवा. हर्बल टी बॅग्ज वापरू नका.
७. व्हिटॅमिन सी, बी आणि डी यांचा आहारात समावेश करा.
याव्यतिरिक्त, पुरेशी झोप घेणे आणि ताण कमी करणे आवश्यक आहे. तसेच, आपल्या आहारात प्रथिने आणि जीवनसत्वांचा पुरेसा समावेश असायलाच हवा.

Share:

गुळ खाण्याचे फायदे /Jaggery effects



आरोग्य टीप्स

गरम दुधात साखर ऐवजी गूळ मिसळून प्यायल्याने काय होते : तुम्ही थक्क व्हाल हे पाहून

दुधात गूळ मिसळा आणि बघा इथे काय होते ह्यामुळे.

जर तुम्हांला साखरे शिवाय गोड दूध प्यायचे असेल तर दूध आणि गूळ ह्यांचे सेवन करायला सुरुवात करा. गूळ हे प्रसिद्ध गोड पदार्थ आहे ज्यात अनेक औषधी गुणधर्म सामावलेले आहेत. दुधासोबत गुळाचे सेवन हे व्हिटॅमिन आणि खनिज ह्यांचे उत्तम स्रोत आहे. आपल्यापैकी अनेक जण साखरेचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करतात, जे भरपूर आजाराचे कारण मानले जाते. साखरेच्या ऐवजी गूळ हा एक चांगला पर्याय आहे. हे तुमच्या चहा किंवा दुधाच्या चवीला स्वादिष्ट आणि हेल्थी बनवेल. दुधासोबत गुळाचे अनेक फायदे घेण्यासाठी वयस्कर व्यक्ती रोजच्या आहारात एक भाग म्हणून ह्याचे सेवन करू शकतात. हे अदभूत मिश्रण तुमची त्वचा, केस आणि अन्य अवयवांवर चमत्कारिक लाभ देते.

जर तुम्ही रोज एक कप दुधाचा आनंद घेण्यासाठी एक वेगळ्याच चवीच्या शोधात असाल तर गूळ हा चांगला पर्याय आहे. तर मग चला जाणून घेऊया गुळासोबत दूध प्यायल्याने होणारे फायदे :



१. वजन कमी करते :

तुम्ही जर लठ्ठपणाने त्रासलेले आहात आणि दूध किंवा चहा मध्ये साखर टाकू इच्छित नाही, तर तुम्ही दुधासोबत गुळाचे सेवन चालू करा. कॅल्शिअमयुक्त दुधासोबत पोटॅशिअमयुक्त गुळ तुम्हांला सडपातळ आणि स्लिम बनवेल. दुधासोबत गुळाचा सर्वात हेल्थी फायदा घेण्यासाठी हे सेवन नियमित घेत जा.



२. अशक्तपणा दूर करते :

बहुतेक महिलांना आयर्न टॅब्लेट्स घेण्यास समस्या असतात, जे अशक्तपणा रोखण्याचे चांगले काम करतात. आपल्या शरीरातील आयर्न ची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही गुळाचा उपयोग करू शकता. ह्याने तुम्ही कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय अशक्तपणाची समस्या दूर करु शकता. गुळासोबत दुधाचा एक ग्लास अशक्तपणाशी लढण्यासाठी गर्भवती महिलांना मदत करतात.


३. त्वचा आणि केस ह्यासाठी फायदेशीर :

दूध आणि गूळ दोन्हीही त्वचा आणि केसांच्या सुंदरतेत महत्वाची भूमिका निभावतात. जर ह्या दोन्हीचे मिश्रण तुम्ही आहारात समाविष्ट केले तर तुम्ही चमकदार आणि तजेलदार त्वचे सोबत लांब मजबूत केसं सुद्धा मिळवू शकतात


४. पिरिएडस चे दुखणे कमी करते :

गूळ मासिक पाळीच्या दुःखाने त्रासलेल्या महिलांसाठी एक चांगला उपाय आहे. मासिक पाळीच्या दरम्यान पोटातील twitch पासून वाचण्यासाठी नियमित काळासाठी दुधासोबत गुळाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. गुळ एक कुलिंग एजंट आहे जे तुमच्या पोटाला शांत करते आणि पोटातील तापमान सामान्य ठेवण्यास मदत करते, विशेष करून उन्हाळ्यात.

५. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते :

आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वात सोपा आणि चांगला उपाय आहे एक ग्लास दुधासोबत गुळाचे मिश्रण. हे दोन्हीही घटक आजारांपासून लढण्यासाठी मानवी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

६. सांधेदुखीवर उपाय :

आपल्या बालपणीपासून आपण ऐकतोय कि मजबूत हाडांसाठी दूध हे सर्वात चांगला उपाय आहे. दुधासोबत गूळ सुद्धा हाडं आणि मांसपेशींना पोषण देण्यास मदत करतात. हा सल्ला नेहमी दिला जातो, गुळासोबत दूध घेतल्याने सांधेदुखी आणि हाडांच्या समस्या कमी करतात.

७. पचनक्रिया सुधारते :

गुळाचे सेवन पचनक्रिया वाढवते. ज्यांना अपचन, आतड्यांचे आजार, अतिसार सारख्या समस्यांनी त्रासलेले असतात त्यांच्यासाठी गुळाचे सेवन हा एक चांगला पर्याय आहे. गुळाचे सेवन तुमची पचनक्रिया आणि आतड्यांच्या कार्यांना नियंत्रित करते. अनेक गुणांनी समृद्ध गूळ आणि दूध तुमच्या आहारात समाविष्ट करा. दुधासोबत गुळाचे नियमित सेवन तुमचे आरोग्य चांगले बनवेल.
Share:

Popular Posts

Total Pageviews

Recent Posts