चेहऱ्याचे सौंदर्य / Beauty Of Face /Face Health & Pimples Treatment

अयोग्य आहार-विहार, रासायनिक व अयोग्य शाम्पू वापरल्यास व केसांची निगा नीट न राखल्यास, वातावरणातील धूळ, माती व प्रदूषण, शरीरात आवश्‍यक व्हिटामिनची कमतरता, तसेच प्रमाणापेक्षा शरीरात कमी-जास्त हार्मोन्स झाल्यास पिंपल्स येतात. पिंपल्सचे येण्याचे प्रकार वेगवेगळे असतात. कोंड्यामुळे डोक्‍यात पिंपल्स, प्रमाणापेक्षा जास्त हार्मोन्सची निर्मिती, तेलकट त्वचेची निगा न राखल्यामुळे येणारे पिंपल्स, एखाद्या खाद्यपदार्थाची ऍलर्जी व पौष्टिक आहार नसणे, वातावरणातील कार्बनमुळे, अपचन व झोपेचे प्रमाण कमी, ताणतणावांमुळे येणारे पिंपल्स, चुकीच्या मेकअपमुळे येणारे पिंपल्स अशा अनेक प्रकारांचा समावेश असतो.

सर्वसाधारणपणे पिंपल्सच्या ट्रीटमेंटसाठी दोन चमचे कच्च्या दुधामध्ये लिंबाचा थोडा रस घालून चेहरा स्वच्छ पुसून काढावा. स्कीनवर डेटॉल आणि वाफारा घ्यावा. पाण्यात त्रिफळा पावडर टाकावी व वाफ घ्यावी. (त्रिफळा ही आयुर्वेदिक ऍस्ट्रिजन आहे.) वाफ भरपूर घ्यावी. वाफ घेऊन झाल्यानंतर पिंपल्सच्या ज्या बिया आल्या असतील, त्या निडलच्या साह्याने साफ कराव्यात. पुन्हा ऍस्ट्रीजन लावून वाफ घ्यावी. भरपूर वाफ दिल्यानंतर कापसाने चेहरा पुसून घ्यावा. जे जे पिंपल्स फोडले आहेत, त्यावर आंबेहळदीचा लेप द्यावा. उरलेल्या चेहऱ्याला जेष्ठमध पावडरच्या पाण्यातून मिश्रण करून लेप द्यावा. वाफ घेतल्यामुळे चेहऱ्याची जी छिद्रे मोकळी होतात, ती बंद होण्यास मदत होते. आंबेहळद पूर्ण वाळल्यावर ती पुसून काढावी व त्या जागी वाळा पावडरचा लेप द्यावा. वाळा पावडर पाण्यात मिश्रण (आंबेहळदीचा उपयोग जखमा पुसून काढण्यासाठी व वाळा पावडर काळे डाग पडू नयेत म्हणून वापरावी) वाळा पावडर व जेष्ठमध वाळल्यावर चेहरा धुवून टाकावा. त्यानंतर त्रिफळा चूर्णाचा लेप चेहऱ्यावर द्यावा. त्रिफळा चूर्ण पूर्ण वाळल्यावर चेहरा धुवावा.

पिंपल्स ट्रीटमेंट केलेल्यांनी वरील ट्रीटमेंट करत असताना त्याच्या दैनंदिन जीवनाची माहिती विचारात घ्यावी. उदा. खाणे, पिणे, झोपणे, राहणे इ. पिंपल्स असणाऱ्यांनी रोज सकाळी ग्लासभर कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून पाणी प्यावे. तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ वर्ज्य करावेत. मांस, मटण मच्छी आहार टाळावा. भरपूर प्रमाणात ताजी फळे खावीत. दिवसातून भरपूर प्रमाणात व सारखे पाणी प्यावे. आहारात पालेभाज्यांचा जास्त समावेश असावा. पुरेशी झोप घ्यावी. मानसिक संतुलन ठीक राहण्यासाठी धावपळ व दगदग टाळावी. (कार्बनच्या पिंपल्सवर ऍस्ट्रिजन शिवाय टाळावे.) कोमा तसेच चंद्रिका डेटॉल हे साबण वापरावा. पिंपल्स फोडू नये, फोडल्यास चेहरा साफ करून घ्यावा. पिंपल्सच्या स्वरूपानुसार लेप द्यावेत. उदा. चेहऱ्यावर काळे डाग पडले असतील, तर वाळा पावडरचा लेप द्यावा. स्कीन रफ झाली असेल तर त्वचा तजेलदार दिसण्यासाठी जेष्ठमधचा लेप द्यावा. प्रमाणापेक्षा जास्त खड्डे पडले असतील तर अनंतमूळ व ज्येष्ठमध यांच्या मिश्रणाचा लेप द्यावा आणि सर्वांत शेवटी त्रिफळा चूर्णाचा लेप द्यावा. त्वचेचा निस्तेजपणा घालवण्यासाठी व डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी महिन्यातून एकदा फेशियल करावे. तसेच फेस क्‍लीन करावे.
विद्या किरवे, थेरगाव

Share:

2 comments:

  1. खड्डे पडले असतील तर अनंतमूळ व ज्येष्टीमध यांच्या मिश्रणाचा लेप द्यावा आणि शेवटी त्रिफळा चूर्णाचा लेपद्यावा.असे लिहिले आहे.पहिला लेप धुतल्यानंतर त्रिफळाचा लेप लावायचा कि अनंतमूळ व ज्येष्टीमध यांचा लेप न धुता त्याच्यावरच त्रिफळाचा लेप द्यायचा?

    ReplyDelete
  2. खड्डे पडले असतील तर अनंतमूळ व ज्येष्टीमध यांच्या मिश्रणाचा लेप द्यावा आणि शेवटी त्रिफळा चूर्णाचा लेपद्यावा.असे लिहिले आहे.पहिला लेप धुतल्यानंतर त्रिफळाचा लेप लावायचा कि अनंतमूळ व ज्येष्टीमध यांचा लेप न धुता त्याच्यावरच त्रिफळाचा लेप द्यायचा?

    ReplyDelete

Popular Posts

Total Pageviews

Recent Posts