हल्ली नॅचरल-हर्बल या नावाखाली बरीच प्रॉडक्ट्स बाजारात मिळतात ; त्यातील बरेच घटक हे अगदी थेट आपल्या स्वैपाकघरातले असतात. मग या लेखात आपण बघू या , स्वैपाकघरातील गोष्टी वापरून घरच्या घरी आपण पॅक कसे तयार करायचे ते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की , या पॅकचा त्वचेवर परिणाम दिसून येण्यासाठी ते नियमितपणे वापरले पाहिजेत.
अतिशय तेलकट किंवा पिंपल्स असलेल्या त्वचेसाठी-
एक टेबलस्पून मुलतानी माती , एक टीस्पून संत्र्याच्या सुकलेल्या सालाची पावडर , एक टी.स्पू. वाटलेला कडुलिंबाचा पाला आणि एक टी. स्पू. वाटलेला पुदिना हे एकत्र करून पाण्यामध्ये त्याची पेस्ट बनवून घ्यावी आणि ती 10 मिनिटं चेहऱ्याला लावावी. नंतर चेहरा स्वच्छ धुऊन टाकावा.
या पॅकमधली मुलतानी माती त्वचेमधील जास्तीचे तेल शोषून घेते. पुदिना पिंपल्ससाठी चांगला असतो. कडुलिंबाचा पाला हा अँटीसेप्टिक आहे व संत्र्याच्या सालीची पावडर चेहरा उजळ करते.
कोरड्या त्वचेसाठी-
या त्वचेसाठी तेल व मॉइश्चर या दोन्हींची गरज असते. खालील पॅक या दोन्ही गोष्टी त्वचेला देते. यासाठी एका अंड्याचा पांढरा भाग , एक टी. स्पून मध , एक टीस्पून ओट्स हे एकत्र करून चेहऱ्याला लावा. 20 मिनिटांनी चेहरा धुऊन टाका.
डीप क्लिन्झिंग पॅक- हा पॅक त्वचेच्या छिदांमध्ये असलेलं तेल , मळ वगैरे साफ करून त्वचेची छिदं मोकळी करतो. त्यामुळे त्वचा तजेलदार दिसते. यासाठी

एक टीस्पून चण्याच्या डाळीचं पीठ ,एक टीस्पून ओटस् , 7-8 थेंब लिंबाचा रस थोड्याश्या पाण्यात एकत्र करून 10 मिनिटं चेहऱ्यावर लावावं. नंतर चेहरा स्वच्छ धुऊन टाकावा. ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांनी हा पॅक आठवड्यातून एकदा तरी लावावा. यामधील चण्याचं पीठ त्वचेतील जास्त तेल शोषून घेते. लिंबू हे निसर्गातील सर्वात उत्तम क्लीन्झर आहे. त्याचप्रमाणे ओटस् व मध हेसुद्धा चांगले क्लीन्झर आहेत.
स्किन लाइटनिंग पॅक
त्वचेवरील टॅन कमी करण्यासाठी हा पॅक फारच छान आहे. यात एक टी स्पून चवळीच्या पाल्याचा रस , पाव चमचा हळद , एक टे. स्पून दही , 1/2 चमचा बदामाची पावडर , पाव चमचा उगाळलेलं जायफळ हे एकत्र करून 15 ते 20 मिनिटं चेहऱ्याला लावावं व नंतर चेहरा स्वच्छ धुऊन टाकावा. यामधील चवळीचा रस , बदाम , दही हे नॅचरल ब्लीचिंग एजंट आहेत , हळद अँन्टीसेप्टिक तर जायफळ हे चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यास मदत करतं.
आय मास्क : यासाठी दोन टे. स्पून किसलेली काकडी , 1 टीस्पून मिल्क पावडर एकत्र करून बंद डोळ्यांवर 10 मिनिटे लावावे. यामधील काकडी ही थकलेल्या डोळ्यांना थंडावा देते व मिल्क पावडर ही डोळ्याभोवतालची काळी वर्तुळं कमी करण्यास मदत करते.
काही भाज्या व फळेसुद्धा पॅक म्हणून वापरता येतात... 1) पपई : ही मृत त्वचा काढुन टाकण्यास मदत करते. कोरड्या त्वचेसाठी हा उत्तम पॅक आहे.
2) टोमॅटो व संत्र्याचा रस हे तेलकट त्वचेसाठी फारच चांगले असतात.
3) केळी व स्ट्रॉबेरी त्वचेला तजेला देतात.
4) शिजलेला कोबी कुस्करून त्यात थोडीशी चंदनाची पावडर एकत्र करा. हा पॅक सेन्सिटिव त्वचेसाठी वापरावा.
5) मुळ्याचा रस त्वचा उजळ बनवण्यासाठी फारच चांगला असतो.
कोरफड : कोरफडीमध्ये सगळे प्रमुख व्हिटॅमिन्स , मिनरल्स , अमायनो अॅसिड्स असतात. ही एक उत्तम नॅचरल मॉयश्चरायजर आहे. कोरफडीचा गर हा आपण नुसता किंवा कशाबरोबर तरी एकत्र करून वापरू शकतो.
उदा. कोरफडीचा गर + मध = मॉयश्चरायजिंग पॅक.
कोरफडीचा गर + पपई + संत्र्याचा रस = व्हिटॅमिनल पॅक.
कोरफडीचा गर + मिल्क पावडर + मध = नरिशिंग पॅक.
टीप्स: 1) लिंबू हे नेहमी कुठल्यातरी पॅकचा घटक असते. नुसतं लिंबू कधीही चेहऱ्याला लावू नये.
2) ज्यांची त्वचा सेन्सिटिव आहे त्यांनी वरील कुठलेही पॅक लावायच्या आधी , पॅच टेस्ट करावी.
3) काही जणांना मधाची अॅलजीर् असते. त्यांनी मध असलेला पॅक वापरू नये.
4) हे पॅक आठवड्यातून दोनदा तरी वापरावेत.

No comments:
Post a Comment