Simple Tips For face..
चेहऱ्याला जर गोरा तसेच कोणतेही डाग नसलेले बनवायचे असेल तर आता पासूनच त्यावर बदाम वाटून लावायला सुरुवात करा. आपल्या घरात असे अनेक वस्तू असतात ज्यांच्या कडे आपण लक्षही देत नाही. यातीलच एक आहे बदाम जो तुमच्या चेहऱ्याला गोरा बनवेल. बदामामध्ये तुम्ही इतर अन्य अनेक वस्तू मिक्स करून यांची पेस्ट बनवू शकता. उदा. ओट्स, मध, दुध किंवा दही इत्यादी. आज येथे आम्ही तुम्हाला बदाम फेस पैक सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा चेहरा काही दिवसातच गोरा दिसायला लागेल :
बदाम दुध फेस पैक - दोन चमचे बदाम पावडर घ्या त्यामध्ये दुध मिक्स करा. या पेस्टला रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा. पंधरा मिनिटांनी जेव्हा पैक सुकेल तेव्हा चेहरा धुवा. रोज असे केल्याने चांगला परिणाम होईल.
बदाम तेल मालीश - त्वचेला स्वच्छ आणि गोरा बनवण्यासाठी चेहऱ्याला आणि त्वचेला बदाम तेलाने मालीश करा. यामुळे ब्लड सर्कुलेशन चांगले होते.
बदाम आणि मध - काही बदाम रात्री भिजत ठेवा त्यानंतर त्यांना सोलून वाटून त्यामध्ये मध मिक्स करा. आता ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि काही वेळाने धुवून टाका.
बदाम आणि ओट्स फेस पैक - एक चमचा ओट्स पावडर आणि एक चमचा बदाम पावडर कच्च्या दुधा मध्ये मिक्स करून पेस्ट करा. याला चेहऱ्यावर पंधरा मिनिट लावा त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका.
बदाम, लिंबू आणि अंडी - एक चमचा बदाम पावडर घ्या त्यामध्ये एका अंडयाचे सफेद भाग फेटून घ्या. त्यानंतर यामध्ये आर्धा चमचा लिंबूचा रस मिक्स करा. चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनी धुवून घ्या.


No comments:
Post a Comment