व्हिटॅमिन B12 किंवा बी 12 जीवनसत्व का गरजेचे आहे ???

व्हिटॅमिन B12 किंवा बी 12 जीवनसत्व का गरजेचे आहे ???
=====================================
आपल्या शरीर पोषणासाठी आवश्यक पोषक द्रव्यांपैकी बी12 जीवनसत्व एक मुख्य घटक आहे ,
◆◆ व्हिटॅमिन B 12 ची कमतरता झाल्यास होणारे
दुष्परिणाम खालील प्रमाणे
● अशक्तपणा जाणवतो थकवा जाणवतो
● निद्रानाश देखील होऊ शकते
● रक्तपांढरी किंवा ऍनिमिया होऊ शकतो
ज्याला आपण शरीरात रक्ताची कमतरता म्हणतो
● भावनिक असमतोल जाणवतो
● शारीरिक आणि बौद्धिक दोन्ही प्रकारचा थकवा जाणवतो
■■ काय खबरदारी घ्यावी ■■
________________________________
◆◆ गर्भनिरोधक गोळ्या ==>
स्रियांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या घेण्याची सवय देखील व्हिटॅमिन B12 च्या कंमरतेला जबाबदार आहे
याचे कारण गर्भनिरोधक गोळ्यामध्ये इस्ट्रोजेन (estrogen)
नावाचे द्रव्य किंवा संप्रेरक असते , ज्याचा खूप तीव्र प्रभाव
फॉलिक ऍसिड ,आणि व्हिटॅमिन B12 यांच्या वर होतो आणि यांची शरीरातील पातळी खालावते
खबरदारी म्हणून जर या गोळ्या घ्यायाचे असतील किंवा घेत असाल डॉक्टरांशी चर्चा करून गोळ्यांचे दुरुपयोग प्रथम जाणून घ्या किंवा व्हिटॅमिन B12 चा पुरवठा करणारे पदार्थ किंवा गोळ्या निश्चितपणे सुरु करा ......
◆◆ ऍसिडिटी किंवा जळजळी वरील गोळ्या ==>
छातीत जळजळ होत असेल ज्याला आपण ऍसिडिटी देखील म्हणतो याचा प्रभाव कमी करण्यासाठी आपण आपण ज्या पित्तश्यामक गोळ्या घेतो या गोळ्या पोटातील आम्लाचे प्रमाण घटवतात , त्यामुळे व्हिटॅमिन B 12 चे शोषण कमी होते
अन्न पचनाच्या समस्या ज्यांना सतत भेडसावत असतात त्यांच्यातही व्हिटॅमिन B12 ची कमतरता असण्याचा धोका अधिक असतो , पचनक्रियेची समस्या व्हिटॅमिन B 12 शोषून घ्यायला अडथळा ठरते ,त्यामुळे
कोलायटीस , पोटातील अल्सर , आतड्यातून स्त्राव निघणे
अशा आजारांमध्ये शरीराला व्हिटॅमिन B 12 मिळण्याचा धोका खूप मोठ्या प्रमाणात असतो
त्यामुळे वरील समस्या कोणालाही भेडसावत असल्यास व्हिटॅमिन B 12 ची पूरक औषधे घेण्याविषयी डॉक्टरांशी चर्चा करावी , कारण B 12 व्हिटॅमिन असलेला प्रत्येक पदार्थ
आपल्या शरीराच्या पंचनसंस्थेला पचेलच असे नाही .....
■■ लक्षणे ■■
व्हिटॅमिन B 12 ची कमतरता आहे हे समजण्यास खूप वेळ लागतो कारण याची लक्षणे खूप हळू हळू दिसू लागतात
बऱ्याचदा स्तिथी गंभीर परिस्थितीत पोहोचल्यावरच लक्षात येते
● अशक्तपणा ● डोके हलके किंवा जड वाटणे ● दम लागणे
● तोंड कडू पडणे आणि जीभ लाल होणे
● मळमळ आणि पोट बिघडणे
● डायरिया आणि वजन कमी होणे
● त्वचा आणि डोळे यांच्यात पिवळे झाक दिसणे
हे वरील काही लक्षणे साधरण दिसून येतात ........
■■ पर्याय ■■
रक्त तपासणी हा एकमेव पर्याय महत्वाचा आहे ,
मात्र काहीवेळा कर्करोगात किंवा गर्भनिरोधक गोळ्या ,
फॉलिक ऍसिड ची कमतरता , आणि गर्भारपण अशा काही परिस्थिती मध्ये रक्त तापसणीतही चुकीचे निदान होऊ शकते ...
काही वेळा यकृत , किडनी यांच्याशी निगडित आजार असल्यास रक्त तपासणी नकारात्मक निकालही देते .......
Share:

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Recent Posts