सौदर्य टिप्स

सौदर्य टिप्स - स्वस्थ और सुंदरbeauty tips

शांतपणे ही पोस्ट वाचून काढा आणि save करून ठेवा
***** चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी -
१. चेहरा सुंदर होण्यासाठी -
मसूर तुपासह घोटून तयार केलेला लेप दुधात मिसळून चेहऱ्यावर लावावा. असे सात दिवस केल्यास चेहरा कमळाप्रमाणे सुंदर होतो.
२. वांग दूर होण्यासाठी -
डाळिंबाची ताजी साल मधासह वाटून लेप केल्याने चेहऱ्यावरचे वांग दूर होतो किंवा वायवर्णाची साल बकरीच्या दुधात उगाळून लेप केल्याने वांग दूर होते.
३. कांती उजळण्यासाठी -
प्रियंगु, केशर, बोराच्या बीमधील मज्जा, सुगंधी वाळा, रक्‍तचंदन यांचे चूर्ण पाणी किंवा दुधात मिसळून तयार झालेला लेप चेहऱ्यावर लावण्याने चेहरा चंद्राप्रमाणे उज्ज्वल होतो.
४. वांग नष्ट होण्यासाठी -o
रक्‍तचंदन, मंजिष्ठा, लोध्र, कोष्ठकोळिंजन, प्रियंगु, वडाचे अंकुर आणि मसूर यांचा लेप केल्यास वांग नष्ट होते व चेहरा सतेज होतो.
५. तारुण्यपीटिका जाण्यासाठी -
लोध्र, धणे, वेखंड यांचा पाण्यासह किंवा दुधासह चेहऱ्यावर लेप केल्यास तारुण्यपीटिका बऱ्या होतात.
***** सर्वसाधारण त्वचेसाठी -
* नितळ त्वचेसाठी भरपूर पाणी पिणे अतिशय गरजेचे आहे.
* दिवसभरात जास्तीत जास्त वेळा चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. त्यामुळे तेलकटपणा कमी होतो आणि त्वचेवर बसलेली धूळ निघून जाऊन पुळ्या- पिंपल्स येत नाहीत.
* त्वचा निरोगी दिसण्यासाठी रोज सकाळी तुळशीचा रस व मध यांचे मिश्रण घेणे फायदेशीर ठरते. त्यामुळे रक्तशुद्धी तर होतेच, शिवाय त्वचा तजेलदार व्हायलाही मदत होते.
* रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे गरजेचे आहे. दिवसभराची धूळ त्यामुळे निघून जायला मदत होते. रात्री चेहरा धुताना ग्लिसरिन, लिंबाचा रस, गुलाबजल समप्रमाणात घेऊन हे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने चेहरा स्वच्छ आणि टवटवीत होतो.
* अल्प प्रमाणात आठवडाभर द्राक्षाचा रस घेतला, तर निस्तेज त्वचा उजळ होण्यासाठी फायदा होऊ शकतो. तसेच द्राक्षाचा रस सर्वांगाला लावल्यानेही त्वचा उजळायला मदत होते.
* त्वचेचा पोत टिकवून ठेवण्यासाठी 3-4 थेंब लिंबूरस, चिमूटभर शुद्ध हळद, 1 चमचा काकडीचा रस एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे.
* काकडीचा रस, संत्र्याचा रस, पपईचा गर, सीताफळाचा गर यापैकी जो उपलब्ध असेल तो चेहऱ्याला लावता येऊ शकतो. त्यामुळे त्वचेचा काळपटपणा कमी होतो. तसेच त्वचा मऊ व्हायलाही हे रस उपयुक्त असतात.
* त्वचा अतिशय नाजूक असते, हे लक्षात घेऊन मेकअप करतानाही काळजी घेणे गरजेचे असते. तसेच मेकअप व्यवस्थित उतरवलाही जायला हवा. त्यासाठी क्‍लिंजिंग म्हणून कच्च्या दुधाचा वापर करता येईल. मेकअपमुळे होणारी त्वचेची हानी टाळता येऊ शकेल.
* मेकअप उतरवण्यासाठी 1 टेबल स्पून तांदळाची पिठी आणि 2 टेबल स्पून दही एकत्र कालवून तयार झालेले मिश्रणही क्‍लिंजिंगप्रमाणे वापरता येईल.
* त्वचेला घट्टपणा यावा, त्वचेवरील सुरकुत्या कमी व्हाव्यात याकरता ग्लिसरिन, अंड्याचा पांढरा भाग, 3-4 थेंब मध या मिश्रणाचे चेहऱ्याला दोनदा थर द्यावेत आणि मिश्रण वाळल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवावा.
* जायफळ दुधात उगाळून लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग कमी व्हायला मदत मिळते.
***** तेलकट त्वचेसाठी -
* रात्री कच्च्या बटाट्याचा कीस चेहऱ्याला चोळून सकाळी थंड पाण्याने चेहरा धुतला, तर त्वचेतील अतिरिक्त तेल कमी व्हायला मदत होते.
* गव्हाचा कोंडा, मुलतानी माती, चंदन, गुलाबपाणी यांचे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने त्वचा निरोगी आणि थंड व्हायला मदत होते.
* चेहऱ्याचा तेलकटपणा कमी करून त्वचा उजळ, मऊ व्हावी यासाठी रात्री मसूर पाण्यात भिजत घालावेत; सकाळी ते वाटून दुधामध्ये घालून मिश्रण तयार करावे आणि ते चेहऱ्याला लावावे.
* पिंपल्सचा त्रास असणाऱ्यांनी 15 दिवसांतून एकदा चेहऱ्याला वाफ द्यावी. पाव चमचा गुलाब पावडर, अर्धा चमचा चंदन पावडर, ग्लिसरिन, गुलाबपाणी यांचा "फेसपॅक' करून लावल्यानेही त्वचा मऊ होते आणि तेलकटपणाही कमी होतो.
* जांभळीची बी पिंपल्सवर लावणे.
* रोजच्या आहारामध्ये पुदिन्याचा वापर करावा म्हणजे पोटाचे कोणतेही विकार होत नाहीत. सीतोपलादी चूर्ण व मध याची पेस्ट करुन चाटण घ्यावे व कोबींच्या पाण्याची वाफ घ्यावी.
* चेहर्‍यावर पिंपल्स असेल तर चेहर्‍यावर बाजरीच्या पिठाचा लेप देणे. चेहरा निखरतो.
* मेरी गोल्ड जेल : चेहर्‍यावर पिंपल्स असेल तर याने मसाज करावा.
***** कोरड्या त्वचेसाठी -
* कोरडेपणा कमी करण्यासाठी चेहरा दिवसातून एकदा तरी कच्च्या दुधाने धुवा.
* त्वचा मऊ- मुलायम व्हावी यासाठी सर्वांगाला लोण्याने मसाज करावा. त्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहायला मदत मिळू शकते.
* रात्री झोपण्यापूर्वी तीळ, बदाम, लवंग असलेल्या तेलाने सर्वांगाला मसाज करावा.
* थंडीत कोल्डक्रीम, मॉइश्‍चरायझरचा आवर्जून वापर करायला हवा. त्यामुळे त्वचा फुटणार नाही आणि त्वचेचे थंडीपासून संरक्षण होऊ शकेल.
* नारळाच्या पाण्यात ताजी साय घालून तयार केलेले मिश्रण लावण्यानेही त्वचेचा कोरडेपणा कमी होतो व सुरकुत्याही कमी होतात.
* चेहरा मऊ होण्यासाठी, रुक्षपणा घालवण्यासाठी कलिंगडाचा रस चेहऱ्याला लावून 15 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवावा.
***** निस्तेज चेहरा :-
* चंदन पावडर, एक चमचा मांजिष्ठ पावडर, एक चमचा कापूर कचरी पावडर, आर्धा चमचा आंबे हळद हे सर्व दुधात मिक्स करुन चेहर्‍यावर लावणे व २० मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुणे. यामुळे चेहर्‍यावर एक प्रकारची चमक येते.
* कोरफड - पिंपल्स असेल तर कोरफडचा गर चेहर्‍यावर मसाज करणे, कोरफडने रंग गोरा होतो. व चेहर्‍याला चमक येते. ज्यांच्या चेहर्‍यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहर्‍यावर कोरफडच्या गराने फेशिअल करावा. कोरफडचा गर केसांना लावल्यास केसातील कोंडा कमी होतो. व केसांना पण प्रकारची चमक येते.
* आवळा, हिरडा, बेरडा समप्रमाणात घेऊन याची पावडर करणे, यालाच ‘त्रिफळा चूर्ण’ म्हणतात. चेहरा स्वच्छ व चमकदार होण्यासाठी एक चमचा त्रिफळा चूर्ण, १० मिनिट पाण्यात भिजवून चेहर्‍यावर लेप देणे.
* गव्हाचा कोंडा : गव्हाच्या कोंड्यात भरपूर प्रमाणात (इ) व्हिटॅमिन असते. तो साईसकट दुधात करुन जाडसर लेप चेहर्‍यावर लावावे. त्यामुळे रंग निखरतो.
* तेलकट त्वचा असेल तर मलई ऐवजी दही व मध घेणे. एक चमचा मध. एक चमचा काकडीचा रस एक चमचा संत्र्याचा रस. हे सर्व मिक्स करुन चेहर्‍याला लावणे. १५-२० मिनिट लावणे. याचा क्रिम म्हणून उपयोग होतो.
***** ओठांचे सौंदर्य -
* ओठांसाठी नेहमी उत्तम दर्जाची "लिप प्रॉडक्‍ट्‌स' वापरावीत. शक्‍यतो नॅचरल लिपस्टिकचा वापर करावा.
* लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना "लिप प्रोटेक्‍टर' लावावे. त्यामुळे ओठ काळे पडणार नाहीत.
* ओठांचा काळेपणा नष्ट करण्यासाठी लिंबाचा रस आणि ग्लिसरिन यांचे मिश्रण लावावे.
* थंडीच्या दिवसांत ओठ फुटण्याची शक्‍यता असते. अशा वेळी ओठांना नियमित साजूक तूप, ताजी साय लावावी. त्यामुळे ओठांचा मऊपणा टिकून राहायला मदत मिळेल.
***** डोळ्यांचे सौंदर्य -
* डोळे स्वच्छ व सतेज दिसण्यासाठी कापसावर गुलाबपाणी घेऊन ते धुवावेत.
* डोळ्यांखाली काळी वर्तुळे असल्यास दुधात बदाम उगाळून ते मिश्रण किंवा काकडीच्या साली डोळ्यांखाली लावाव्यात.
* चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवा. सकाळी धुऊन टाका. यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.
* डोळ्यांना थंडावा मिळण्यासाठी काकडीचे काप, गार दुधाच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवाव्यात.
* संगणकाच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांवर ताण येतो. तो ताण दूर करण्यासाठी लिंबूरस व बदामतेल एकत्र करून डोळ्यांना हलका मसाज करावा.
* डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सकाळी अनवाणी पायांनी हिरवळीवर चालावे.
* झोपताना डोळ्यांत आयुर्वेदिक अंजन घातल्याने किंवा आयुर्वेदिक काजळ घातल्यानेही डोळ्यांचे आरोग्य टिकून राहायला मदत मिळते.
***** हाता-पायांचीही काळजी -
चेहेऱ्याची जितकी काळजी घेतली जाते तेवढी हाता-पायांची घेतली जातेच असे नाही. त्यामुळे अनेकदा हात-पाय काळवंडलेले दिसतात. चेहऱ्याप्रमाणेच हाता-पायांचे सौंदर्य टिकवण्यासाठीही घरच्या घरी उपाय करता येतात.
* उन्हाने रापलेल्या हातांचा काळेपणा घालवण्यासाठी बेसनाचे पीठ दुधात कालवून हातांना मसाज करावा.
* पपईचा गर चोळल्यानेही काळेपणा कमी होऊ शकतो.
* लिंबाचा रस कोपर व गुडघ्यांना चोळल्याने तिथल्या मृत पेशी निघून जातात आणि काळेपणा नाहीसा होतो.
* थंडीच्या दिवसांत हाता-पायांना लवंगतेल, बदामतेल, कोल्डक्रीमने मसाज केल्यास त्यांचा मऊपणा टिकून राहतो.
* आठवड्यातून किमान दोनदा सौम्य शाम्पू गरम पाण्यात टाकून त्यात 10 मिनिटे पाय ठेवावेत. नंतर पाय स्वच्छ पुसून साय व हळदीने तळव्याला मसाज करावा. त्यामुळे भेगांचे प्रमाण कमी होऊन पायांचे सौंदर्यही वाढते.
* पायांना भेगा असल्यास ग्लिसरिन व लिंबूरसाचे मिश्रण भेगांना रोज रात्री लावल्यानेही फायदा होऊ शकतो.
* नखांची योग्य वाढ होण्यासाठी त्यांना कॅल्शिअमची आवश्‍यकता असते. त्यासाठी कॅल्शिअमयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. तसेच लिंबू चोळण्याने नखांना चमक येते.
* नखांना पुरेसे पोषण न मिळाल्याने ती तुटतात. ती मजबूत व्हावीत याकरता ग्लिसरिन, मध, लवंगतेल यांच्या मिश्रणात नखे भिजवावीत.
***** निरोगी केसांसाठी -
लांबसडक, निरोगी, काळेभोर केस हे सौंदर्याचे एक परिमाण मानले जाते. मात्र, केसांचे योग्य पोषण व्हावे, यासाठी त्यांची जाणीवपूर्वक काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे.
* केसांत कोंडा झाल्यास कोरफडीचा गर केसांना 10 मिनिटे लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत.
* केसांना चमक येण्यासाठी मसूर डाळ पाण्यात वाटून केलेला लेप केसांना लावावा.
* केसांना मेंदी लावल्याने "नॅचरल कंडिशनिंग' तर होतेच, शिवाय शरीरातील उष्णताही कमी होते आणि डोक्‍याच्या त्वचेचा कोरडेपणा जातो.
* काकडीचा रस केसांना लावल्याने केसांची चांगली वाढ होते.
* खोबरेल तेलात कापूर टाकून केसांना मसाज केल्याने कोंडा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडत नाही.
* वापरलेली चहा पावडर पाण्यात उकळवून, गाळून त्या पाण्याने केस धुतल्याने केसांना चांगला रंग येतो व केस मजबूत व्हायला मदत होते.
* केसांचे आरोग्य टिकावे यासाठी आठवड्यातून दोनदा केस धुवावेत व धुण्यापूर्वी केसांना तेल लावावे. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळते.
* केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा, लिंबू, नागरमोथा यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. आवळा, मेथी पावडरच्या वापराने केस चमकदार होतात. .
* केसांत कोंडा झाल्यास कोरफडीचा गर केसांना 10 मिनिटे लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत.
* केसांना चमक येण्यासाठी मसूर डाळ पाण्यात वाटून केलेला लेप केसांना लावावा.
* केसांना मेंदी लावल्याने "नॅचरल कंडिशनिंग' तर होतेच, शिवाय शरीरातील उष्णताही कमी होते आणि डोक्‍याच्या त्वचेचा कोरडेपणा जातो.
* काकडीचा रस केसांना लावल्याने केसांची चांगली वाढ होते.
* खोबरेल तेलात कापूर टाकून केसांना मसाज केल्याने कोंडा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडत नाही.
* वापरलेली चहा पावडर पाण्यात उकळवून, गाळून त्या पाण्याने केस धुतल्याने केसांना चांगला रंग येतो व केस मजबूत व्हायला मदत होते.
* केसांचे आरोग्य टिकावे यासाठी आठवड्यातून दोनदा केस धुवावेत व धुण्यापूर्वी केसांना तेल लावावे. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळते.
* केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा, लिंबू, नागरमोथा यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. आवळा, मेथी पावडरच्या वापराने केस चमकदार होतात.
* केस गळत असेल तर जास्वंद जेलने केसांची मसाज करणे.
* कोरफड जेलने केसांची मसाज केल्यास केसातील कोंडा कमी होतो व केसांना चमक येतो.
***** केस गळत असेल तर :
* त्रिफळा चूर्ण (दर महिन्यात २ चमचे वाढवत जाणे) रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घ्यावे. जंत कृमी असेल तर ३ चमचे त्रिफळा चूर्ण, एक चमचा वावडींग पावडर मिक्स करुन ३ दिवस रात्री झोपतांना कोमट पाण्याबरोबर घेणे. रोज मुठ मुठ फुटाणे खाण्याने हार्ट ऍटकचा त्रास होत नाही.
* केस गळत असेल तर एक मध्यम आकाराचे डाळींब सालीसकट मिक्सरमध्ये बारीक करणे. जास्वंद फुल, १०-२० ब्राम्हीपाने, १ चमचा आवळा पावडर, मेहंदी पाने अंदाजे हे सर्व बारीक करून २०० ग्रॅम तिळाच्या तेलात लोखंडीच्या कढईत मंद गॅसवर तडतड येईपर्यंत गरम करून कोमट असतानांच एका बाटलीत भरुन ठेवावे व ते केसांना लावावे.
* डोक्यात उवा झाल्यास सीताफळ बीची पावडर तेलात मिक्स करुन केसांच्या मुळांन लावणे. तेल लावतांना डोळ्यात जाणार नाही याची काळजी घेणे.
***** चेहर्‍यावर काळे डाग व डोळ्याखाली काळी वर्तुळे :-
* तेलकट त्वचा असल्याने धूळ चेहर्‍यावर बसते. त्यामुळे चेहर्‍यावर काळे डाग पडण्यास प्रारंभ होतो. त्याला आपण ब्लॅक हेड्स म्हणतो.
* ज्यांच्या चेहर्‍यावर काळे डाग पिंपल्स असेल तर त्यांनी एक चमचा दही, १ चमचा मसूरदाळ यांची पेस्ट करुन चेहर्‍यावर लावणे. १५-२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुणे.
* पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावणे.
* जायफळ पाण्यत उगळून पिंपल्स व डोळ्याभोवती काळी वर्तुळ असेल तर लावावे. टोमॅटोचा रस १ चमचा, काकडीचा रस एक चमचा, कोबीचा रस एक चमचा हे सर्व मिक्स करून चेहर्‍यावर लावल्यास काळे डग व वर्तुळे कमी होतात.
* पिंपल्स जास्त असेल तर कोबी किसुन त्यात जायफळ पेस्ट मिसळुन जाडसर भार चेहर्‍यावर देणे. टोमॅटोच्या आतील गर स्मॅश करुन चेहर्‍यावर लावणे. चेहर्‍यावर चमक येते व चेहरा निखरतो.
* चेहर्‍यावर पिंपल्स व पिंपल्सचे डाग असेल तर तुळशीच्या पानाचा रस १ चमचा पुदीन्याचा रस व थोडे हळद पेस्ट करून हे मिश्रण पाण्यात करुन घेणे.
* सर्दी खोकला असेल तर नेपाली अमृता काढा दिवसातून दोनदा, ३ दिवस घेणे.
* उन्हाळ्याच्या दिवसात उन्हापासून रक्षण करण्यासाठी काकडीचा रस चेहर्‍याला लावून बाहेर पडणे.
***** चेहर्‍यावरील व अंगावरील लव -
* पापी तेल याने चेहर्‍याची मसाज केल्यास रोम छिद्र भरुन येतात व चेहर्‍यावरील लव कमी होते. रोज लावले तरी चालते.
* चेहर्‍यावरील व अंगावरील लव कमी होण्यासाठी पपिता पावडर, नीमा पावडर, मंजिष्ठा समप्रमाणात घेऊन त्यात पाव चमचा आंबेहळद टाकणे व त्याच्या चार पट मसूर डाळीचे पीठ टाकणे. कच्चा दुधात पेस्ट करून केसांच्या उलट्या दिशेने लावावे. पीठी ज्याप्रमाणे काढतो त्याप्रमाणे चोळावे नंतर साय / लोणी लावणे. कोल्ड क्रीम लावणे.
* उटणे -
१) म्हसूर डाळ आर्धा किलो
२) आंबे हळद तोळा
३) गुलाब पावडर ५० ग्रॅम
४) संत्र्याची साल ५० ग्रॅम
५) चंदन पावडर ५० ग्रॅम
६) कडूलिंबाच्या पानाची पावडर
७) वाळा ५० ग्रॅम
८) मुलतानी माती ५० ग्रॅम
९) पपई पावडर ५० ग्रॅम
हे सर्व मिक्स करुन बरणीत भरुन ठेवावे. पाहिजे तेवढे उटणे घेऊन कच्चा दुधात पेस्ट करणे व ती सर्व अंगास लवुन आंघोळ करणे. ज्यांची कोरडी त्वचा असेल, हिवाळ्यात अंगाची फार खाज सुटत असेल तर त्यांनी हे मिश्रण लावुन आंघोळ करावी. फार चांगले असते.
***** चेहर्‍यावर सुरुकुत्या -
* चेहर्‍यावर सुरुकुत्या असेल तर त्यावर केशर व बदामची कच्च्या दुधात पेस्ट करुन लावणे.
* चेहर्‍यावर सुरकुत्या असेल तर सफरचंद किसून त्यात एक चमचा कच्चे दुध टाकुन व ही पेस्ट चेहर्‍यावर लावणे.
***** जरा हे करून पहा -
1) सगळ्यात आधी पाण्याने चेहरा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर चेहर्‍यावर हलक्या हाताने मसाज करा. स्क्रबचा प्रयोग केल्याने चेहर्‍यावरील तेलकटपणा कमी होतो.
2) घराच्या बाहेर पडताना चेहर्‍यावर मॉइस्चराइज़रचा उपयोग जरूर करा.
3) एक मोठ्या पातेल्यात पाणी गरम करा, उकळत्या पाणीची वाफ चेहर्‍यावर घेतल्याने ब्लॅक हेड्स घालवता येऊ शकतात. ब्लॅक हेड्सपासून सुटका करून घेण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.
4) ब्लॅक हेड्स स्ट्रीप केल्याने सहज दूर होतात.
5) ब्लॅक हेड्सवर वारंवार हाताची बोटे फिरवू नये. तसे केल्याने ते चेहर्‍यावर पसरण्याची शक्यता असते.
6) त्वचा चांगली राहावी म्हणून टोनर, क्लीनर व मॉइश्चरायजर्स नियमित लावले पाहिजे. त्यात तेही ब्रॅंडेड पाहिजेत.
7) दिवसभरात भरपूर पाणी प्यायले पाहिजे. जेणेकरून पोट साफ रहाते.
8) तेल व मसालेयुक्त पदार्थाचे जास्त सेवन केल्याने त्याचा त्वचेवर विपरित परिणाम होतो.
9) नियमित व्यायाम व संतुलित आहार घेतल्याने चेहर्‍यावर तेज येते. त्वचेचा रंग खुलतो.
***** घाम येणे व अंगाला दुर्गंधी येणे -
१. लेपन - चंदन, नागकेशर, पद्मकाष्ठ, वाळा, ज्येष्ठमध, मंजिष्ठा, अनंतमूळ, क्षीरविदारी, श्‍वेत दूर्वा, कृष्ण दूर्वा या दहा द्रव्यांना वर्ण्य म्हणतात. यांच्या सेवनाने किंवा लेपनाने त्वचा सतेज होते, कांती उजळण्यास मदत मिळते.
२. त्वचेचे रोग- सिद्धार्थक स्नान - नागरमोथा, मदनफळ, आवळा, हिरडा, बेहडा, करंजाची पाने, बहाव्याची पाने, इंद्रयव, दारुहळद, सप्तपर्णाची पाने यांचा काढा मिसळलेल्या पाण्याने स्नान करण्याने त्वचेचे रोग होत नाहीत. याच द्रव्यांच्या उटण्याने त्वचा उजळण्यास मदत मिळते.
३. घाम व दुर्गंधनाशक उटणे - जांभळाची पाने, अर्जुनाची फुले व कुष्ठाचे चूर्ण यांचे उटणे लावल्यास अधिक घाम येणे व अंगाला दुर्गंधी येणे हे त्रास बरे होतात.
४. लेप - सुगंधी वाळा, वाळा, तमालपत्र, चंदन व केशर यांचे चूर्ण कांजीसह मिसळून लेप केल्यास शरीराचा दुर्गंध नष्ट होतो.
५. सेवन - गोरखमुंडीचे चूर्ण सेवन करण्यानेही शरीराचा दुर्गंध नष्ट होतो.
***** टॅनिंग टिप्स.=
1. खूप पाणी प्या. काकडीचा, कलिंगडाचा ज्यूस प्या. काकडीच्या स्लाइस डोळ्यांवर ठेवा.
2. गार दुधात कापसू बुडवून डोळ्यांवर ठेवा.
3. टॅन झालेल्या त्वचेच्या भागावर कोरफडीचा रस लावणं केव्हाही चांगलंच.
4. खायच्या डोशाचं पीठ टॅन झालेल्या भागावर लावा. ते सुकेपर्यंत ठेवा आणि मग धुवून टाका. त्वचा उजळेल.
5. कच्च्या दुधात बेसन व लिंबाचे थेंब टाकून हे मिश्रण त्वचेवर लावा. 15 मिनिटं ठेवून धुवून टाका. सतत 4 आठवडे असं केल्यास चांगला परिणाम दिसेल.
6. 1 चमचा दूध पावडर, 1 चमचा मध, 1 चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा बदामाचं तेल एकत्र करा. त्वचेवर लावून 15 मिनिटं ठेवून धुवून टाका. काळपटपणा जाऊन त्वचा चमकदार होईल. शिवाय मऊपणाही राहील.
***** सौंदर्य वाढवा आता ग्लिसरीनने =
* 2-3 थेंब ग्लिसरीन व लिंबाचा रस मिसळून ओठांवर लावल्याने ओठ गुलाबी राहतात.
हायड्रोजन पेरॉक्साइड एक चमचा घेऊन त्यात काही थेंब ग्लिसरीन टाकून फाटलेल्या भेगांना लावून ठेवावे. काही वेळा नंतर पाय स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे, त्याने पायांचा भेगा कमी होऊन पाय नरम होतील.
* मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी एक चमचा बेसन, एक चमचा काकडीचा रस, थोडीशी हळद व ग्लिसरीनचे 3-4 थेंब मिसळून मानेवर लावावे. नियमितपणे जर याचा प्रयोग केला तर काळेपणा दूर होतो.
* नख कडक झाली असतील तर कोमट पाण्यात 3-4 थेंब ग्लिसरीन टाकून काही वेळ नखांना त्यात बुडवून ठेवावे. त्याने नख नरम पडून लगेच कापता येतील.
* एक चमचा मध आणि एक चमचा ग्लिसरीन पूर्ण चेहऱ्यावर लावून 20 मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हे नियमित केल्यास चेहर्‍यावर तेज येईल.
* हाताच्या कोपर्‍यांचा व गुडघ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी त्या भागावर ग्लिसरीन लावावे. त्यानंतर कोमट पाण्यात एक जाडसर कपडा भिजवून त्याने रगडावे. असे केल्याने काळेपणा दूर होतो.
* 2 चमचा ग्लिसरीन, दोन चमचा सिरका मिसळून केसांना लावा. 15-20 मिनिटानंतर केस चांगले धुऊन टाकावे. याने केसातील कोंडा दूर होतो आणि केस नरम व चमकदार राहतात.
चार चमचे लिंबाचा रस, चार चमचे ग्लिसरीन, चार चमचे गुलाब जल मिसळून त्याला चांगले फेटून घ्यावे व एका बाटलीत भरून ठेवावे. हे एक चांगले हँड लोशन आहे. याचा उपयोग तुम्ही केव्हाही करू शकता.
* पपईच्या सालांना उन्हात वाळून त्याचे पावडर तयार करावी. त्यात ग्लिसरीन मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचा कोरडेपणा दूर होतो.
* एक किलो साखरेत 100 ग्रॅम लिंबाचा रस टाकून त्याला शिजवावे. खाली उतरवल्यानंतर त्यात 1 चमचा ग्लिसरीन, एक चमचा मध टाकावे. हे घरच्याघरी तयार झालेले वॅक्स आहेसौदर्य टिप्स - स्वस्थ और सुंदर
***** चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी -
१. चेहरा सुंदर होण्यासाठी -
मसूर तुपासह घोटून तयार केलेला लेप दुधात मिसळून चेहऱ्यावर लावावा. असे सात दिवस केल्यास चेहरा कमळाप्रमाणे सुंदर होतो.
२. वांग दूर होण्यासाठी -
डाळिंबाची ताजी साल मधासह वाटून लेप केल्याने चेहऱ्यावरचे वांग दूर होतो किंवा वायवर्णाची साल बकरीच्या दुधात उगाळून लेप केल्याने वांग दूर होते.
३. कांती उजळण्यासाठी -
प्रियंगु, केशर, बोराच्या बीमधील मज्जा, सुगंधी वाळा, रक्‍तचंदन यांचे चूर्ण पाणी किंवा दुधात मिसळून तयार झालेला लेप चेहऱ्यावर लावण्याने चेहरा चंद्राप्रमाणे उज्ज्वल होतो.
४. वांग नष्ट होण्यासाठी -
रक्‍तचंदन, मंजिष्ठा, लोध्र, कोष्ठकोळिंजन, प्रियंगु, वडाचे अंकुर आणि मसूर यांचा लेप केल्यास वांग नष्ट होते व चेहरा सतेज होतो.
५. तारुण्यपीटिका जाण्यासाठी -
लोध्र, धणे, वेखंड यांचा पाण्यासह किंवा दुधासह चेहऱ्यावर लेप केल्यास तारुण्यपीटिका बऱ्या होतात.
***** सर्वसाधारण त्वचेसाठी -
* नितळ त्वचेसाठी भरपूर पाणी पिणे अतिशय गरजेचे आहे.
* दिवसभरात जास्तीत जास्त वेळा चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. त्यामुळे तेलकटपणा कमी होतो आणि त्वचेवर बसलेली धूळ निघून जाऊन पुळ्या- पिंपल्स येत नाहीत.
* त्वचा निरोगी दिसण्यासाठी रोज सकाळी तुळशीचा रस व मध यांचे मिश्रण घेणे फायदेशीर ठरते. त्यामुळे रक्तशुद्धी तर होतेच, शिवाय त्वचा तजेलदार व्हायलाही मदत होते.
* रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे गरजेचे आहे. दिवसभराची धूळ त्यामुळे निघून जायला मदत होते. रात्री चेहरा धुताना ग्लिसरिन, लिंबाचा रस, गुलाबजल समप्रमाणात घेऊन हे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने चेहरा स्वच्छ आणि टवटवीत होतो.
* अल्प प्रमाणात आठवडाभर द्राक्षाचा रस घेतला, तर निस्तेज त्वचा उजळ होण्यासाठी फायदा होऊ शकतो. तसेच द्राक्षाचा रस सर्वांगाला लावल्यानेही त्वचा उजळायला मदत होते.
* त्वचेचा पोत टिकवून ठेवण्यासाठी 3-4 थेंब लिंबूरस, चिमूटभर शुद्ध हळद, 1 चमचा काकडीचा रस एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे.
* काकडीचा रस, संत्र्याचा रस, पपईचा गर, सीताफळाचा गर यापैकी जो उपलब्ध असेल तो चेहऱ्याला लावता येऊ शकतो. त्यामुळे त्वचेचा काळपटपणा कमी होतो. तसेच त्वचा मऊ व्हायलाही हे रस उपयुक्त असतात.
* त्वचा अतिशय नाजूक असते, हे लक्षात घेऊन मेकअप करतानाही काळजी घेणे गरजेचे असते. तसेच मेकअप व्यवस्थित उतरवलाही जायला हवा. त्यासाठी क्‍लिंजिंग म्हणून कच्च्या दुधाचा वापर करता येईल. मेकअपमुळे होणारी त्वचेची हानी टाळता येऊ शकेल.
* मेकअप उतरवण्यासाठी 1 टेबल स्पून तांदळाची पिठी आणि 2 टेबल स्पून दही एकत्र कालवून तयार झालेले मिश्रणही क्‍लिंजिंगप्रमाणे वापरता येईल.
* त्वचेला घट्टपणा यावा, त्वचेवरील सुरकुत्या कमी व्हाव्यात याकरता ग्लिसरिन, अंड्याचा पांढरा भाग, 3-4 थेंब मध या मिश्रणाचे चेहऱ्याला दोनदा थर द्यावेत आणि मिश्रण वाळल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवावा.
* जायफळ दुधात उगाळून लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग कमी व्हायला मदत मिळते.
***** तेलकट त्वचेसाठी -
* रात्री कच्च्या बटाट्याचा कीस चेहऱ्याला चोळून सकाळी थंड पाण्याने चेहरा धुतला, तर त्वचेतील अतिरिक्त तेल कमी व्हायला मदत होते.
* गव्हाचा कोंडा, मुलतानी माती, चंदन, गुलाबपाणी यांचे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने त्वचा निरोगी आणि थंड व्हायला मदत होते.
* चेहऱ्याचा तेलकटपणा कमी करून त्वचा उजळ, मऊ व्हावी यासाठी रात्री मसूर पाण्यात भिजत घालावेत; सकाळी ते वाटून दुधामध्ये घालून मिश्रण तयार करावे आणि ते चेहऱ्याला लावावे.
* पिंपल्सचा त्रास असणाऱ्यांनी 15 दिवसांतून एकदा चेहऱ्याला वाफ द्यावी. पाव चमचा गुलाब पावडर, अर्धा चमचा चंदन पावडर, ग्लिसरिन, गुलाबपाणी यांचा "फेसपॅक' करून लावल्यानेही त्वचा मऊ होते आणि तेलकटपणाही कमी होतो.
* जांभळीची बी पिंपल्सवर लावणे.
* रोजच्या आहारामध्ये पुदिन्याचा वापर करावा म्हणजे पोटाचे कोणतेही विकार होत नाहीत. सीतोपलादी चूर्ण व मध याची पेस्ट करुन चाटण घ्यावे व कोबींच्या पाण्याची वाफ घ्यावी.
* चेहर्‍यावर पिंपल्स असेल तर चेहर्‍यावर बाजरीच्या पिठाचा लेप देणे. चेहरा निखरतो.
* मेरी गोल्ड जेल : चेहर्‍यावर पिंपल्स असेल तर याने मसाज करावा.
***** कोरड्या त्वचेसाठी -
* कोरडेपणा कमी करण्यासाठी चेहरा दिवसातून एकदा तरी कच्च्या दुधाने धुवा.
* त्वचा मऊ- मुलायम व्हावी यासाठी सर्वांगाला लोण्याने मसाज करावा. त्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहायला मदत मिळू शकते.
* रात्री झोपण्यापूर्वी तीळ, बदाम, लवंग असलेल्या तेलाने सर्वांगाला मसाज करावा.
* थंडीत कोल्डक्रीम, मॉइश्‍चरायझरचा आवर्जून वापर करायला हवा. त्यामुळे त्वचा फुटणार नाही आणि त्वचेचे थंडीपासून संरक्षण होऊ शकेल.
* नारळाच्या पाण्यात ताजी साय घालून तयार केलेले मिश्रण लावण्यानेही त्वचेचा कोरडेपणा कमी होतो व सुरकुत्याही कमी होतात.
* चेहरा मऊ होण्यासाठी, रुक्षपणा घालवण्यासाठी कलिंगडाचा रस चेहऱ्याला लावून 15 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवावा.
***** निस्तेज चेहरा :-
* चंदन पावडर, एक चमचा मांजिष्ठ पावडर, एक चमचा कापूर कचरी पावडर, आर्धा चमचा आंबे हळद हे सर्व दुधात मिक्स करुन चेहर्‍यावर लावणे व २० मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुणे. यामुळे चेहर्‍यावर एक प्रकारची चमक येते.
* कोरफड - पिंपल्स असेल तर कोरफडचा गर चेहर्‍यावर मसाज करणे, कोरफडने रंग गोरा होतो. व चेहर्‍याला चमक येते. ज्यांच्या चेहर्‍यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहर्‍यावर कोरफडच्या गराने फेशिअल करावा. कोरफडचा गर केसांना लावल्यास केसातील कोंडा कमी होतो. व केसांना पण प्रकारची चमक येते.
* आवळा, हिरडा, बेरडा समप्रमाणात घेऊन याची पावडर करणे, यालाच ‘त्रिफळा चूर्ण’ म्हणतात. चेहरा स्वच्छ व चमकदार होण्यासाठी एक चमचा त्रिफळा चूर्ण, १० मिनिट पाण्यात भिजवून चेहर्‍यावर लेप देणे.
* गव्हाचा कोंडा : गव्हाच्या कोंड्यात भरपूर प्रमाणात (इ) व्हिटॅमिन असते. तो साईसकट दुधात करुन जाडसर लेप चेहर्‍यावर लावावे. त्यामुळे रंग निखरतो.
* तेलकट त्वचा असेल तर मलई ऐवजी दही व मध घेणे. एक चमचा मध. एक चमचा काकडीचा रस एक चमचा संत्र्याचा रस. हे सर्व मिक्स करुन चेहर्‍याला लावणे. १५-२० मिनिट लावणे. याचा क्रिम म्हणून उपयोग होतो.
***** ओठांचे सौंदर्य -
* ओठांसाठी नेहमी उत्तम दर्जाची "लिप प्रॉडक्‍ट्‌स' वापरावीत. शक्‍यतो नॅचरल लिपस्टिकचा वापर करावा.
* लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना "लिप प्रोटेक्‍टर' लावावे. त्यामुळे ओठ काळे पडणार नाहीत.
* ओठांचा काळेपणा नष्ट करण्यासाठी लिंबाचा रस आणि ग्लिसरिन यांचे मिश्रण लावावे.
* थंडीच्या दिवसांत ओठ फुटण्याची शक्‍यता असते. अशा वेळी ओठांना नियमित साजूक तूप, ताजी साय लावावी. त्यामुळे ओठांचा मऊपणा टिकून राहायला मदत मिळेल.
***** डोळ्यांचे सौंदर्य -
* डोळे स्वच्छ व सतेज दिसण्यासाठी कापसावर गुलाबपाणी घेऊन ते धुवावेत.
* डोळ्यांखाली काळी वर्तुळे असल्यास दुधात बदाम उगाळून ते मिश्रण किंवा काकडीच्या साली डोळ्यांखाली लावाव्यात.
* चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवा. सकाळी धुऊन टाका. यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.
* डोळ्यांना थंडावा मिळण्यासाठी काकडीचे काप, गार दुधाच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवाव्यात.
* संगणकाच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांवर ताण येतो. तो ताण दूर करण्यासाठी लिंबूरस व बदामतेल एकत्र करून डोळ्यांना हलका मसाज करावा.
* डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सकाळी अनवाणी पायांनी हिरवळीवर चालावे.
* झोपताना डोळ्यांत आयुर्वेदिक अंजन घातल्याने किंवा आयुर्वेदिक काजळ घातल्यानेही डोळ्यांचे आरोग्य टिकून राहायला मदत मिळते.
***** हाता-पायांचीही काळजी -
चेहेऱ्याची जितकी काळजी घेतली जाते तेवढी हाता-पायांची घेतली जातेच असे नाही. त्यामुळे अनेकदा हात-पाय काळवंडलेले दिसतात. चेहऱ्याप्रमाणेच हाता-पायांचे सौंदर्य टिकवण्यासाठीही घरच्या घरी उपाय करता येतात.
* उन्हाने रापलेल्या हातांचा काळेपणा घालवण्यासाठी बेसनाचे पीठ दुधात कालवून हातांना मसाज करावा.
* पपईचा गर चोळल्यानेही काळेपणा कमी होऊ शकतो.
* लिंबाचा रस कोपर व गुडघ्यांना चोळल्याने तिथल्या मृत पेशी निघून जातात आणि काळेपणा नाहीसा होतो.
* थंडीच्या दिवसांत हाता-पायांना लवंगतेल, बदामतेल, कोल्डक्रीमने मसाज केल्यास त्यांचा मऊपणा टिकून राहतो.
* आठवड्यातून किमान दोनदा सौम्य शाम्पू गरम पाण्यात टाकून त्यात 10 मिनिटे पाय ठेवावेत. नंतर पाय स्वच्छ पुसून साय व हळदीने तळव्याला मसाज करावा. त्यामुळे भेगांचे प्रमाण कमी होऊन पायांचे सौंदर्यही वाढते.
* पायांना भेगा असल्यास ग्लिसरिन व लिंबूरसाचे मिश्रण भेगांना रोज रात्री लावल्यानेही फायदा होऊ शकतो.
* नखांची योग्य वाढ होण्यासाठी त्यांना कॅल्शिअमची आवश्‍यकता असते. त्यासाठी कॅल्शिअमयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. तसेच लिंबू चोळण्याने नखांना चमक येते.
* नखांना पुरेसे पोषण न मिळाल्याने ती तुटतात. ती मजबूत व्हावीत याकरता ग्लिसरिन, मध, लवंगतेल यांच्या मिश्रणात नखे भिजवावीत.
***** निरोगी केसांसाठी -
लांबसडक, निरोगी, काळेभोर केस हे सौंदर्याचे एक परिमाण मानले जाते. मात्र, केसांचे योग्य पोषण व्हावे, यासाठी त्यांची जाणीवपूर्वक काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे.
* केसांत कोंडा झाल्यास कोरफडीचा गर केसांना 10 मिनिटे लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत.
Share:

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Recent Posts