मकर संक्रांत सुगड पूजा

मकर संक्रांत:-
सुगड पूजा

मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील गृहिणीचा अगदी आवडता सण आहे. ह्या दिवशी महिला घर आवरून नवीन वस्त्र परिधान करून, दागिने, नाकात नथ घालून तयार होवून बोळक्याची (सुगड) पूजा करून आपल्या संसारासाठी सुख संपती, धन-धान्य कधी कमी पडू नये म्हणून देवाजवळ मागणे करतात.

पूजेसाठी ५ बोळकी (सुगड), १ पणती, नवा पांढरा दोरा, हळद-कुंकू, नवीन कपडा, तीळ-गुळ, ऊस, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर व ताम्हन अथवा स्टीलचे ताट, दिवा व अगरबत्ती घ्यावी. पाच बोळक्यांना दोरा बांधावा, त्यांना हळद-कुंकू लावावे, त्यामध्ये उसाचे काप, तील-गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर घालावे वरती एक पणती ठेवावी हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे वरतून एक नवीन कापड घालून झाकून ठेवावे. समोर निरांजन, अगरबत्ती लावावी. ह्याचा अर्थ माझ्या संसारात धनधान्य, कपडा लक्ता कशाची कमरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये.
Kalpana rane

Share:

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Recent Posts